Headlines

विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तिवर सक्तीने दंडात्मक कारवाई…

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी : सार्वजनिक, धार्मिक व व्यक्तिगत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी यापुढे विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तिवर सक्तीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोरोना टेस्ट वाढविण्यात येणार आहेत. मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून सार्वजनिक, धार्मिक व व्यक्तिगत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात रुग्ण वाढत नसले तरी भविष्यात ही रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचविण्यासाठी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यानी आज जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणेची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा प्रजनन व बाल अधिकारी डॉ संदेश कांबळे उपस्थित होते.

You cannot copy content of this page