प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली भेट

⚡कणकवली ता.२६-: कणकवलीचे नूतन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सदिच्छा भेट घेतली. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात कातकर यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

यावेळी तहसीलदार रमेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर, सागर वारंग, सखाराम हुंबे, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते. नूतन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी याआधी कणकवली नायब तहसीलदार, कणकवली तहसीलदार पदी उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे येथील जनतेच्या अडचणींची कल्पना कातकर याना आहे. साहजिकच आपल्या पूर्वानुभवाचा फायदा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल आणि प्रांताधिकारी कार्यालयाचा लोकाभिमुख प्रशासकीय कारभार अनुभवायला मिळेल अशा भावना पिळणकर यांनी व्यक्त केल्या. पुढील प्रशासकीय कारकिर्दीला प्रांताधिकारी कातकर याना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page