पोलीस करीत आहेत डोळेझाक;
नागरिक त्रस्त
वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी शहरात अनेक ठिकाणी राजरोधपणे आपल्या पोलीस खात्याच्या डोळ्यासमोर अवैद्य मटका धंदा सुरू आहे. हे धंदे गेले अनेक वर्ष वैभववाडी शहरात चालू आहेत कोणीतरी तक्रार केली की तात्पुरती कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचा दाखवला जातो परंतु लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा हे धंदे राजरोसपणे सुरू होतात.
गेले दोन महिन्यापूर्वी काही नवीन मटका धंदे चालू झाल्याची माहिती मिळाली आहे व अशा प्रकारची चर्चा संपूर्ण शहरभर आहे हे नवीन धंदे विद्यमान नगरपंचायतीच्या काही आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत काही सत्ताधारी वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळेच हे धंदे सुरू आहेत. त्यामुळे आपले कोण काही करणार आहे असा आविर्भावात हे हे धंदेवाले बिंनदास आहेत. तालुक्यातील गोरगरिबांचे संसार उध्वस्त करीत आहेत यामध्ये तालुक्यातील अनेक बेरोजगार युवक त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग अल्पवयीन मुले हे सुद्धा या मटक्याच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या पुढील जीवनावर त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गोव्यातील बनावट दारू सुद्धा वैभववाडी शहरातील बियर बार मध्ये विकली जात आहे तरी शहरातील या मटका धंदा व बनव दारूचा आपल्याकडून शोध घेऊन लवकरच या अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वैभवाडी पोलीस निरीक्षक खंडागळे यांच्या कडे करण्यात आली आहे आपण या अवैध धंदे व मटका धंद्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत उग्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशाऱ्याचे निवेदनातु देण्यात आला आहे. यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, नगरसेवक रणजीत तावडे मनोज सावंत शहरप्रमुख शिवाजी राणे, स्वप्निल रावराणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो वैभववाडी तालुक्यातील अवैध धंद्याबद्दल पोलीस निरीक्षक खंडागळे यांना निवेदन देताना मंगेश लोके रणजीत तावडे आदी शिवसैनिक छाया संजय शेळके वैभववाडी
