वेत्ये येथे उद्या खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२२-: श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ वरची गावकरवाडी वेत्ये यांच्याकडून कै. गंगाराम रामचंद्र निगुडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन उद्या रविवार सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे.

ही स्पर्धा 600 किलो वजनी गटात होणार आहे या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 11, 111 व चषक तसेच द्वितीय पारितोषिक 5,111 व चषक असे असून बेस्ट फ्रेंटमॅन 1,111 तर बेस्ट लास्टमॅन 1,111 असे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी 600 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.

You cannot copy content of this page