दयानंद मांगले यांना जाहीर झाला पुरस्कार
देवगड –
नेहरू युवा केंद्र (भारत सरकार)संलग्न श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल अवार्ड २०२३ साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड चे सुपुत्र दयानंद यशवंत मांगले निवड राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल समाजरत्न अवॉर्ड करीता निवड करण्यात आली आहे.या अवॉर्डचे वितरण
२३ एप्रिल २०२३ रोजी स.१० वा.दत्त मंगल कार्यालय कोरोची शहापूर रोड कोरोची या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे उदघाटक हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने,प्रमुख पाहुणे आम.प्रकाश आवाडे,सुप्रसिद्ध वास्तू तज्ञ ज्योतिर्विद पुणे आनंद पिंपळकर,यांच्या अध्यक्षतेखाली मराठी चित्रपट अभिनेता चेतन दळवी,जि. प.सदस्य डॉ अशोकराव माने,तुझ्यात जीव रंगला फेम (गोदाक्का)छाया सांगावकर ,लागीर झालं जी फेम (नीलम काकी)ऍड मंजुषा खत्री,तुझ्यात जीव रंगला फेम (श्रीपती)सलीम जमादार ,तुझ्यात जीव रंगला फेम (शिवाप्पा )महेश भोसले ,हभप महाराज आकाश पळसे,शिवव्याख्याते ह.भ.प.प्रथमेश इंदुलकर ,यांच्या समवेत प्रमुख उपस्थितीत मान्यवर इचलकरंजी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी,नगराध्यक्ष हातकणंगले अरुणकुमार जाणवेकर,मेकअप आर्टिस्ट सुनील मुसळे शांतानंदप्रसाद महाराज,डॉ संतोष भोरे सरपंच कोरोची,पोलीस निरीक्षक अभिजित पाटील,मराठी चित्रपट अभिनेते दिगदर्शक प्रकाशचंद्र शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून ,संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणीका प्रकाशन ,व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अमित काकडे यानी दिली आहे.
