जय्यत तयारी ; कार्यकर्त्यानी
उपस्थित राहण्याचे तेली याचे आवाहन..
⚡सावंतवाडी,ता.१८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या भाजपच्या महाविजय अभियानाचा समारोप उद्या सायंकाळी ६ वा. गांधी चौक सावंतवाडी येथे होत आहे. त्याची जय्यत तयारी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे भव्य दिव्य अशी ही सभा होणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचे मार्गदर्शन पदाधिकारी कार्यकर्त्यांना लाभणार आहे तरी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन श्री तेली यांनी केले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून भाजपाचा महा विजय संपर्क अभियान सावंतवाडी मतदारसंघात राबवण्यात आले प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघ निहाय हे अभियान घेण्यात आले याला जनतेकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर याची सांगता आता सावंतवाडीत होत आहे एकूणच या पार्श्वभूमीवर भाजपकडून वातावरण निर्मिती करण्यात आली असून भूतो न भविष्यती अशी सभा गांधी चौकात होणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष श्री तेली यांनी व्यक्त केला आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शत प्रतिशत भाजप हे ध्येय घेऊन भाजपने वाटचाल सुरू केली आहे सध्या स्थितीत राज्यात असलेली सत्ता लक्षात घेता पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे याच हेतूने कार्यकर्त्यांना एक बळ मिळावे त्यांना काम करण्याची उमेद प्राप्त व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे एकूणच योग्य नियोजन जिल्हाध्यक्ष श्री तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहनही श्री तेली यांनी केले आहे त्यांनी केले आहे.
