*’स्मार्ट ग्राम’ पुरस्कार न्हावेली ग्रामपंचायतीस प्रदान*

*💫सावंतवाडी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा तालुकास्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार न्हावेली ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या पुरस्काराचे वितरण ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले आहे. न्हावेली ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ सुंदर गाव म्हणून या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केले आहे. म्हणून या ग्रामपंचायतीला या पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुरस्कारसमवेत सरपंच सौ. प्रतिभा प्रकाश गावडे, ग्रामसेवक सौ. तृप्ती राणे, उपसरपंच विठोबा गावडे, ग्रामपंचायत सदस्य शरद धाऊसकर, भावना धाऊसकर व सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सौ. प्रतिभा गावडे यांनी गेल्या तीन वर्षात आदर्शवत काम केले आहे. ग्रामसडक योजनेसारख्या कामांना गती देऊन गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांना एकत्र आणून अनेक कामे मार्गी लावली आहेत. तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सक्षम करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. ग्रामपंचायतीमार्फत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवुन देण्यात त्या कार्यरत असतात. सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायतीने २०१९-२० या योजनेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या ग्रामपंचायतीला ५ लाख रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.

You cannot copy content of this page