*💫मालवण दि.२०-:* भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण अंर्तगत शहर शाखा मालवण येथे महिला धम्म प्रशिक्षण शिबीर दि .१९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन केंद्रीय शिक्षीका धम्म मान सहाय्यक, संपादक स्वाती गायकवाड यांच्या हस्ते झाले . यावेळी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ कदम, जिल्हा सरचिटणीस भाऊ कासार्डेकर, जिल्हा माहिला विभाग प्रमुख सुषमा हरकुळकर, मालवण महिला विभाग दर्शना गुळवे, माजी जिल्हा सरचिटणीस विलास वळंजू, ता. प. वि. उपाध्यक्ष रविकांत कदम, कार्यालयीन सचिव संजय पेंडुरकर, महिला सचिव विशाखा कदम, शहर शाखा मालवण महिला विभाग स्मिता सिध्दार्थ जाधव उपस्थित तसेच सर्व उपासिका शिबीरार्थी उपस्थित होते. एकूण नऊ गाव शाखेत हे शिबीर संपन्न होत आहे. मालवण शहर शाखा, चौके, धामापूर, काळसे, पेंडुर, तळगाव, गोळवण, हिवाळे, ओवळीये या गाव शाखेत शिबीर होत आहे. त्यासाठी स्वाती गायकवाड, छाया गवई, रमा गांगुर्डे, स्वाती शिंदे, गीता कांबळे, शाशिकला बागुल, सुषमा हरकुळकर, सुमन वाघ या केंद्रीय शिक्षिका मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व केंद्रीय शिक्षिकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पी.के. चौकेकर, तालुका संघटक नरेंद्र पेंडुरकर, शहर शाखेचे कार्यकर्ते संतोष जाधव, पुरुषोत्तम मालवणकर पत्रकार संग्राम कसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालवण सरचिटणीस सूर्यकांत कदम यांनी केले.
मालवणात महिला धम्म प्रशिक्षण शिबिर…
