आचरा ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध कामांचा कामांचा शुभारंभ…

*💫मालवण दि.२०-:* आचरा गावातील विविध रस्ते व पायवाटा यांची कामे सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आचरा जीप सदस्यकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. रस्ते, पायवाटा यांची कामे होत असल्याने आचरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या शुभारंभ प्रसंगी आचरा सरपंच प्रणया टेमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, आचरा उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी सरपंच, विद्यमान सदस्य मंगेश टेमकर, माजी सरपंच डॉ.प्रमोद कोळंबकर, सदस्य मुजफ्फर मुजावर, रेश्मा कांबळी, अनुष्का गावकर,ममता मिराशी, जगदीश पांगे, ठेकेदार अमित चव्हाण, अब्दुल मुजावर, गणपत चौघुले, गोपाळ खोत, मदन खोत, आदी मान्यवर उपस्थित होते. नागरीसुविधा मधून मंजूर निधीतून आचरे गावातील विविध कामे सुरू करण्यात आली आहे यात कस्टम ऑफिसकडे जाणारा रस्ता, आचरा पोलीस ठाण्यातकडे जाणारा रस्ता, हिर्लेवाडी- खोतवाडी कडे जाणारा रस्ता यांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

You cannot copy content of this page