श्वेताज् योगा ग्रुप कणकवलीतर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा….

*💫कणकवली दि.२०-:* जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून श्वेताज् योगा ग्रुप कणकवलीच्या 50 महिलांनी कणकवली कलमठ आणि बांधकरवाडी या दोन ठिकाणी सामूहिकरीत्या 1700 सूर्यनमस्कार घालून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कार हे निरामय शतायुषी आयुष्याची सोपी गुरुकिल्ली आहे असे श्वेताज् योगा ग्रुपच्या अध्यक्षा सौ.श्वेता गावडे -पळसुले यांनी सांगितले. यावेळी श्वेताज् योगा ग्रुपतर्फे पूर्ण वर्षात घेण्यात आलेल्या योगासन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ देखील करण्यात आला. यावेळी श्वेताज् योगा ग्रुपच्या सर्व योगसाधिका मोठया संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page