आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.०९-: डॉ.आंबेडकर जयंती उत्सव, वेंगुर्ला तालुका व शहर समिती, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई-शाखा वेंगुर्ला, दलित समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती ११ ते १५ एप्रिलपर्यंत आनंदवाडी येथे साजरी केली जाणार आहे.

  यानिमित्त दि.११ रोजी सायं.६.३० वा. महात्मा फुले जयंती, दि.१२ रोजी दु. ३ वा. चित्रकला स्पर्धा, सायं.६ वा. बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा,  मुलांच्या विविध स्पर्धा, दि.१३ रोजी सायं.४ वा. महिलांच्या विविध स्पर्धा,  दि.१४ रोजी स.९.३० वा. पंचशील ध्वजारोहण व भिमवंदना, स.१० वा. मुलांचे भाषणे, ११.३० वा. आनंदवाडी ते साई मंगल कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली, दु.१२ वा. ‘रात्रीस खेळ चाले‘ फेम अभिनेत्री मंगल राणे यांचे ‘मला समजलेले बाबासाहेब‘ यावर भाष्य, दु. ३ वा. अॅड.संदिप निबाळकर, जयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण जाधव, बौद्ध हितवर्धक संघाचे अध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास जाधव, सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहानी जाधव यांच्या उपस्थितीत जाहीर अभिवादन सभा,   सायं.५.३० वा. साई मंगल कार्यालय ते बाजारपेठ कॅम्प मार्गे आनंदवाडीपर्यंत सामाजिक ऐक्य व सद्भावना मिरवणूक, दि.१५ रोजी रात्रौ ९ वा. आनंदवाडी येथे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
You cannot copy content of this page