⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मॅक्सिमियन कार्डोज यांची निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपातर्फे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विनायक गवंडळकर, तालुका सरचिटणीस प्रशांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, ओंकार चव्हाण, पत्रकार समितीचे सचिव विनायक वारंग, सहसचिव सीमा मराठे, उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर व योगेश तांडेल, खजिनदार प्रथमेश गुरव, जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष दाजी नाईक, जिल्हा सदस्य दिपेश परब यांच्यासह प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के.जी.गावडे, एस.एस.धुरी, भरत सातोसकर, रविकिरण परब, समिर गोसावी, विवेक गोगटे, संदेश राऊळ, अनिल राणे, अजय गडेकर आदी उपस्थित होते.
