*💫मालवण दि.२२-:* गेले सात आठ महिने तहानभूक बाजूला ठेवून नगरपालिका प्रशासन कोरोना विरोधात यशस्वी लढा देत असताना सुदेश आचरेकर यांना त्याचे कौतुक करायचे नसेल तर प्रशासनाच्या मनोधैर्याचे तरी खच्चीकरण करू नये. प्रशासन निद्रिस्त नसून आचरेकर हेच निद्रिस्तावस्थेत आहेत, कोरोना बाबत न.प प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची कोणतीही माहिती न घेता आचरेकर जाहीर वक्तव्य करीत आहेत. एकीकडे जाहीर व्यासपीठावरून नगराध्यक्ष व आमदारांच्या कामाचे कौतुक करणाऱ्या आचरेकर यांची ही गोष्ट त्यांच्या पक्षातील लोकांना खटकली असणार, म्हणूनच नाईलाजास्तव आचरेकर यांना नगराध्यक्ष व आमदारांच्या विरोधी भूमिका मांडण्याची वेळ आली, अशी खरमरीत टिका मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे. मालवणात वाढत्या पर्यटकांबरोबर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त करत मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष, जिल्हा प्रशासन, आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत हे कोणतीही उपाययोजना करत असल्याचा आरोप करत टीका केली होती. या टीकेला नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. प्रशासन निद्रिस्त नाही तर आचरेकर निद्रिस्त आहेत, त्यामुळे ते कुठलीही माहिती न घेता जाहीर व्यक्तव्य करीत आहेत. शासनाने अनलॉक करताना काही नियम घालून अनलॉक केले आहे. या मध्ये पर्यटकांची ज्या ठिकाणी निवास व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांनी या नियमाचे पालन करणे बंधनकारक केले आहे आणि अश्या लेखी सूचना न.प. ने मालवण मधील निवासी हॉटेल मालकांना लेखी स्वरूपात कळविले आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांची स्वॅब टेस्ट करण्याचे या नियमावलीत अंतर्भूत नाही. आचरेकर यांच्या मते मालवणात १ लाख पर्यटक येणार आहेत, म्हणजे १ लाख लोकांची स्वॅब टेस्ट करायची का? असा सवाल नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी करत पर्यटक आपली काळजी घेत आहेत असा दावा केला. आचरेकर हे टीका करून प्रशासनावर दाखवीत असलेला अविश्वास निश्चितच प्रशासनाचे मनोबल खच्चीकरण करणारा आहे. आचरेकर यांनी कोरोनाबाबत प्रसारमाध्यमातून सूचना करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून चर्चा केली असती तर त्यांच्या योग्य सूचनांचा निश्चितच विचार केला गेला असता. त्यामुळे आचरेकर यांनी मालवणच्या विकासाच्या बाबत केलेल्या योग्य सूचना कराव्यात त्यांचा निश्चित विचार केला जाईल. कोरोना कालावधीत कुठलेही राजकारण करू नका. राजकारण बाजूला ठेवून आमदार, पालकमंत्री, खासदार, सर्व प्रशासन या संकटावर मात करण्याचा मनोमन प्रयत्न करत आहेत. आचरेकर यांना त्यांचे कौतुक करायचे नसेल तर त्यांचे मनोधेर्य तरी खच्चीकरण करू नये, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे. पर्यटकांना मास्कची सक्ती आमदार वैभव नाईक यांनी पर्यटकांनी यांनी मास्क वापरू नये असा केवळ सल्ला दिला नाही तर पर्यटक ‘अतिथी देव भवो’ असल्याने त्यांना दंड करू नका तर त्यांना मास्क लावणे बाबत प्रबोधन करा, त्यांना मास्क वाटप करा, स्पीकर द्वारे मालवण मधील पर्यटन स्थळावर कोविड च्या नियमांचे पालन करा अशी जाहीर प्रसिद्धी द्या या सूचना केल्या. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केलेली असून सूचना करूनही त्या न पाळणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. आम. नाईक यांनी शासन स्तरावर प्रयत्न करुन किल्ला बोटसेवा, वॉटर स्पोर्ट्स याना परवानगी मिळवून दिल्याबाबत पर्यटन व्यावसायिकांकडून आमदारांचे अभिनंदन होत असल्याचे बघून विरोधकांना पोटशूळ उठले आहे आणि या मानसिकतेतून विरोधक आमदारांच्या व्यक्तव्याचा विपर्यास करत आहेत. आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यात एकमत आहे. उलट आचरेकर यांची भूमिका दुटप्पी आहे. आमदार यांच्या भूमिकेला आचरेकर यांच्या पक्षातील बहुतांशी सदस्यांनी त्यावेळी सहमती दर्शवली होती आणि आता आचरेकर विरुद्ध प्रतिक्रिया देत आहेत. आचरेकर यांनीच जनतेशी खेळ मांडला आहे, अशी टीका नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केली आहे. मालवणातील मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाययोजना राबविण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रशासनाकडून याबाबत माहिती घेतली असती तर आचरेकर यांना कळले असते. यावरून नगराध्यक्ष झोपले की स्वतः झोपलात यांचे आत्मपरीक्षण आचरेकर यांनी करावे. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा हे काम कसे मार्गी लागेल यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असा सल्ला कांदळकर यांनी आचरेकर यांना दिला. गणेश कुशे यांना शुभेच्छा गणेश कुशे यांनी नगराध्यक्ष आणि कंपनी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची जी पोकळ धमकी दिली आहे त्याला मी शुभेच्छा देतो. एकदा हा प्रयत्न केला होता तेव्हा उपोषण सोडायला काय प्रयत्न करावे लागले हे त्यांनी अनुभवले आहे. खाऊन पिऊन उपोषण केल्याचे सर्व जनतेला माहीत आहे आणि मंडपात शेवटी कुशे एकटेच शिल्लक राहिले
प्रशासन नव्हे, सुदेश आचरेकर हेच निद्रिस्तावस्थेत – नगराध्यक्ष महेश कांदळगावकर
