देशातील ३ लाख ग्रामीण डाकसेवक २६ रोजी एकदिवसीय संपावर

सिंधुदुर्गातील ७०० डाकसेवक होणार संपात सहभागी – अभिमन्यू धुरी

*💫मालवण दि.२२-:* देशातील ३ लाख ग्रामीण डाक सेवक आपल्या प्रलंबित मागण्यासाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय संपावर जाणार आहेत. या संपाबाबत केंद्र सरकारला दि. ५ नोव्हेंबर रोजी कॉ. जनरल सेक्रेटरी नवि दिल्ली कॉ. महारेवय्या व असिस्टंट जनरल सचिव कॉ. बापु अहिरे यांनी लेखी स्वरुपात नोटीस दिली आहे. या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०० ग्रामीण डाक सेवक सहभागी होणार आहेत, असा दावा माजी अध्यक्ष अभिमन्यु धुरी व जे. एम. मोडक व हरियान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. या संपाबाबतच्या प्रमुख मागण्या ग्रामीण डाक सेवक युनियनने स्पष्ट केल्या आहेत. १९७७ चा सुप्रिम कोर्टाचा आदेश लागू करुन ३ लाख ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करा व त्याची डयुटी ८ तास करावे. ४४ वर्ष खात्याची नोकरी करुन रिटायर होताना त्यांना पेन्शन मिळावी. सेवेत असताना फेस्टीवल अॅडव्हान्स मिळावा व १२-२४-३६ तिन प्रमोशन मिळावे व मेडिकल सुविधा मिळावी व या सर्व गोष्टी कमलेशंद्र गुप्ता अहवाल ७वा वेतन आयोगाने लेखी स्वरुपात दिलेले आहे पण केंद्र सरकारने कमलेशचंद्र गुप्ता अहवाल काटछाट करुन ग्रामीण डाक सेवकांना लागू केला व त्यांना फरक व बेसिकवर अन्याय केला गेला, १० वर्षांनी १८५० पगार वाढ दिली गेली व फरक ३५ हजार रुपये व मागील ६ व्या वेतन आयोगात फरक ६० हजार ग्रामीण डाक सेवकांना मिळाला होता, त्या प्रमाणात ग्रामीण डाक सेवकांना मिळावा. सध्या ग्रामीण डाक सेवकांना भारतीय डाक पेमेन्ट बँक, सेव्हिंग खाती, आर. डी. खाती, सुकन्या समृद्धी, ग्रामीण टपाल जिवन विमा, लाईट बिल, फोन बिल, पेमेन्ट बँक कार्डवर केले जाते. ५ वर्ष टि डी खाते, पत्र डिलिवरी, मनिऑर्डर, पार्सल, रजिस्टर, स्पिड पोस्ट, व्ही. पी. पार्सल इत्यादी सेवा घर टु घर करावी लागतात. या सर्व ग्रामीण डाक सेवकांनी कोरोना मध्ये स्वतःचा जिव धोक्यात घालून ६ महिने ग्रामीण जनतेला अविरत सेवा दिली त्याचे काहीतरी फलीत केंद्र सरकारने द्यावे, अशा डाकसेवकांच्या मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक व एफ. एन. पिओ या सर्व संघटनांनी एक दिवशीच संपाची हाक दिली आहे. हा संप झाला तर देशाचे ६० कोटीचे नुकसान आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा लक्ष ग्रामीण डाक सेवकावर रहावा. या सर्व मागण्यांचा मंत्र्यांनी सहानभुतीपूर्वक विचार करावा. ग्रामीण डाक सेवक दिल्ली स्तरावर १९७६ पासून लढे उभारीत आहे युनियन पण म्हणावे तसे यश आलेले नाही. ४५ वर्ष टपाल खात्याची सेवा करुन आज त्यांना ५ हजार रुपये पेन्शन मिळत नाही. ५ लाख निवृत्त होताना ग्रॅज्युईटी मिळत नाही. ४४ वर्षे सेवा करुन १६ हजार पगार मिळतो. तरी या सर्व बाबीकडे कृपया केंद्र सरकारने लक्ष घालून ग्रामीण डाक सेवकांना न्याय द्यावा, असे सांगत या नियोजित संपात सर्व ग्रामीण डाक सेवकांनी एकजुटीने संपात उतरुन संप यशस्वी करावा, असे आवाहन अभिमन्यु धुरी, जे. एम. मोडक व हरियान यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

You cannot copy content of this page