*💫मालवण दि.२२-:* काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर तिघा युवकांनी अत्याचार केल्याची घटना मालवणात घडली असतानाच एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून युवकाने शरीर संबंध ठेवत लग्न करण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दयानंद सखाराम जंगले (वय-२२ रा. धुरीवाडा, मालवण) याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबतची तक्रार संबंधित युवतीने माटुंगा-मुंबई पोलिस ठाण्यात दिली. तेथून ही तक्रार येथील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित युवतीने दिलेल्या तक्रारीत दयानंद जंगले याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवले. अनेकवेळा भेटवस्तू दिल्या. लग्न करू असे सांगत शरीरसंबंध ठेवले. ही घटना जून महिन्यात घडली. मात्र गेले काही महिने तो लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचे युवतीने म्हटले आहे. त्यानुसार युवतीने मुंबई येथील माटुंगा पोलिस ठाण्यात दयानंद जंगले याच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. ही तक्रार येथील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. संशयित दयानंद जंगले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील या करत आहेत.