कणकवलीत भाजप स्थापना दिवस साजरा

⚡कणकवली ता.०६-: भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिन निमित्त आम. नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ध्वज फडकवून भारतमाता प्रतिमा, पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व भाजपा स्थापना दिवस साजरा केला.
त्याच प्रमाणे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत तळेरे
येथे मुख्य चौकात भाजपचा पक्ष ध्वज फडकवण्यात आला.

यावेळी तालुका अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती दिलीप तळेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते . कणकवली येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात यावेळी भाजपचा पक्ष ध्वज फडकवण्यात आला. त्याचप्रमाणे भारतमाता प्रतिमा, पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

You cannot copy content of this page