▪️व्हाईस चेअरमन पदी जयराम गवंडी; माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
सावंतवाडी ता.०५-: मडुरा सोसायटी चेअरमन पदी ज्ञानेश्वर परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर व्हाईस चेअरमन पदी जयराम गवंडी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया आज मडूरा सोसायटी येथे पार पडली. नवनिर्वाचित चेअरमन,व्हाईस चेअरमन यांचे भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
