*शिवप्रेमी कडून करण्यात आले होते आयोजन
*💫वेंगुर्ले दि१९-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रेडी येथील यशवंत गडावर जलोषात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी पंचक्रोशीतील लहान मुले, महिला, वृध्द, सर्व शिवप्रेमी तसेच शिवप्रेमी संघटना उपस्थित होत्या. यावेळी शिरोडा ते रेडी ग्रामपंचायत पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर रेडी ग्रामपंचायत पासून पुढे यशवंत गडावर पायी चालत पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी ढोल पथक व बँजो पथक विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते. यावेळी बँजो पथकाने शिवस्फुर्ती जागवणारी गीते वाजवली होती. यावेळी गडावर श्री बागलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आजचे हिंदुत्व या विषयावर मार्गदर्शन केले आहे. तसेच यावेळी सागरी जीव रक्षक, चित्ररथ मधील सहभागी शिवप्रेमी , गड संवर्धन करणाऱ्या सर्व शिवप्रेमी संघटना यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच शिवप्रेमींनी खुप परिश्रम घेतले होते.
