⚡बांदा ता.२८-: शेर्ले श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या प्रमुख मंदिरातील श्री देवी माऊली मंदिराचा भूमिपूजन समारंभ गुरुवार ३० मार्च रोजी सकाळी १० ते ३ वाजताच्या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेर्ले येथील प्रमुख देवस्थानातील प्रमुख मंदिरे ही सुमारे १५व्या ते १६व्या दशकात पूर्वजांनी सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीतून उभारली आहेत. मंदिरे १६व्या शतकातील असत्यामुळे फारच जीर्ण अवस्थेत आहेत. पूर्वजांनी निर्माण केलेला हा भक्तीचा ठेवा, त्याचे जतन करण्यासाठी शेर्ले ग्रामस्थ व मानकरी एकत्र येऊन लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. भाविकांनी या कार्यासाठी तत्परतेने हातभार लावावा. या सुंदर वास्तूच्या भूमिपूजनाचा सोहळा आपल्या सर्वांच्या प्रबळ पाठिंब्यावर दि. ३० मार्च रोजी संपन्न होत आहे. मंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक सोहळ्यास सर्वांनी पस्थित राहून सोहळा यशस्वी करावा असे आवाहन देवस्थान प्रमुख मानकरी मंडळी, श्री देवी माऊली रवळनाथ स्थानिक सल्लागार उपसमिती, श्री देवी माऊली – रवळनाथ जीर्णोद्धार मुख्यसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.
