साई रामनवमी उत्सवा निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.२८-: बांदा शहारातील आळवाड्यातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठामध्ये गुरूवार दिनांक ३० रोजी साई रामनवमी उत्सवा निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५.३० वाजता साईची काकड आरती, सकाळी ७.३० वा‌जता साई नित्य पुजा, सकाळी ९ वाजता श्री सत्यदत्त पूजा, दुपारी १२ वाजता साईची मध्यान्ह आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद व तिर्थप्रसाद, सायं. ६ वाजता साईची सांज आरती, रात्रौ ७ वाजता भजन, रात्रौ ९ वाजता साईची शेजारती आदी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला बुधवार दिनांक २९ रोजी रात्रौ ७.३० वाजता संगीत प्रेमीसाठी संगीत मेजवानी ‘स्वरसंगम’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. गायक विठ्ठल केळुसकर, गितेश कांबळी, सौ. सिध्दी परब, सिंथेसायजर महेद्र मांजरेकर, हार्मोनियम सुशांत नाईक, तबला प्रदीप वाळके, पखवाज कुणाल आळवे हे आपली कला सादर करणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन श्री साईचे क्रुपाआशिर्वाद घ्यावेत व तिर्थ प्रसादाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यांनी केले आहे.
फोटो :-
बांदा मठातील श्री साईबाबांची प्रतिमा.

You cannot copy content of this page