आडवली मालडी विभागातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

आ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उपतालुका प्रमुख बाबा सावंत यांचा उपक्रम

⚡मालवण ता.२७-: कुडाळ मालवण विधानसभा कुडाळ संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्त मालवण तालुक्यातील आडवली मालडी विभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्या वतीने विभागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमूख दीपक उर्फ बंडू चव्हाण, उपविभाग प्रमुख अमित फोंडके, अंबाजी सावंत, किर्लोस माजी सरपंच प्रदीप सावंत, माजी उपसरपंच दीपक किर्लोस्कर, किर्लोस शाखा प्रमुख विकास लाड, उपसरपंच अजित लाड, चेअरमन स्वानंद भावे, रामगड सरपंच शुभम मटकर, माजी सरपंच विलास घाडीगांवकर, युवासेना शाखा प्रमुख गणेश पराडकर, ग्रामपंच्यात सदस्य सौ. उल्का उल्लास तारी, सौ. लक्षित मेथर, सौ. स्वानंदी सदाशिव साध्ये, असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, माजी सरपंच रामचंद्र राऊत, ओवळीये शाखा प्रमुख अप्पी परब, श्रावण शाखा प्रमुख स्वप्निल दळवी, चेअरमन दुलाजी परब, राठीवडे उपसरपंच स्वप्नील पुजारे, सुभाष धुरी, शाखा प्रमुख संतोष धुरी, आडवली सरपंच आडवलकर, उपसरपंच सौ. सोनाली पराडकर, शाखा प्रमुख दीपक घाडी, हिवाळे युवासेना अध्यक्ष गीतेश खेडेकर, असरोंडी शाखा प्रमूख सुनील सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page