आ वैभव नाईक वाढदिवसानिमित्त आयोजन
मालवण : (प्रतिनिधी)
आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भव्य मोफत नेत्रतपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली असून या अंतर्गत पोईप ग्रामपंचायत कार्यालय येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला पोईप पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचा शुभारंभ पोईप गावचे सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पालव, परशुराम नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम पालव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्ररोग तज्ञ डॉ. भाग्यश्री धामतिडक यांच्या उपस्थितीत नेत्रतपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी केल्यावर ज्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा नागरिकांच्या डोळ्यांची आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
यावेळी पोईप ग्रामपंचायत सदस्य पंकज वर्दम, गिरीश पालव पोईप विभाग प्रमुख विजय पालव, माजी सरपंच शिवरामपंत पालव उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण, पोईप महिला विभाग प्रमुख आरती नाईक, शाखा प्रमुख अनिल येरम, पोईप संस्थेचे चेअरमन विठ्ठल नाईक, व्हाईसचेअरमन राजेंद्र पालव, विलास सांडव, नाना तावडे, पांडुरंग चव्हाण, बाळा सांडव आदींसह शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
