देवगड जामसंडे विषय समिती सभापती पदी शिवसेना महाविकास आघाडीचे वर्चस्व

⚡देवगड ता.२७-: देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषयी समिती सभापती व सदस्य पदाची पदाच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतीची विशेष सभा देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित होते.

या विषय समिती सभापती निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीचे नगरसेवक व शिवसेना गटनेते संतोष रवींद्र तारी यांची पुरवठा सभापतीपदी तर तेजस द. मामघाडी, याची बांधकाम समिती सभापती पदी व विशाल विकास मांजरेकर यांची आरोग्य स्वच्छता सभापती पदी निवड करण्यात आली.महिला बाल कल्याण समिती सभापती पदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांची निवड करण्यात आली. शिवसेना महाविकास आघाडी सत्ताधारी गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरोधी गट यांच्यात निवडणूक होऊन सत्ताधारी महाविकास आघाडी गटाने देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधी गटाकडून बांधकाम समिती सभापती पदासाठी प्रणाली मिलिंद माने आरोग्य स्वच्छता सभापती पदाकरिता आद्या अमेय गुमास्ते आणि आणि पुरवठा समिती सभापती पदाकरिता ऋचाली दि. पाटकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती.नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन निवडणूक प्रक्रिया पार पडली व या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडी गटाने दोन विरुद्ध एक अशा मताने सभापती पदाच्या तीनही जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आरोग्य महिला बालकल्याण विकास समिती सभापती पदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष मिताली रा. सावंत यांचे निवड करण्यात आली.
दरम्यान शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत मधील सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांना लेखी पत्राद्वारे विषय सभापती पदाकरिता प्रणाली माने,आद्या गुमास्ते,ऋचाली पाटकर या भाजप च्या उमेदवारांना मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता तो धुडकावून लावून शिवसेना महाविकास आघाडीचे गटनेते संतोष तारी यांनी सत्ताधारी ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार विषय समिती सभापती निवडणुकीत उतरविले व बाजी मारली.

You cannot copy content of this page