⚡मालवण ता.२७-: मालवण येथील श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळ, राम मंदिर, गवंडीवाडा यांच्यातर्फे दि. ३० मार्च रोजी श्रीराम मंदिर गवंडीवाडा येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० रोजी सकाळी ११ वा. बाळ कासरलकर यांचे कीर्तन, दुपारी १२.३० वा. श्रीराम जन्म, १ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार असून इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे आराध्या गवंडी (९४०५८०५८५०), चित्रा हरमलकर यांच्याकडे द्यावीत. १ एप्रिल रोजी रात्री १० वा. श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळ, राम मंदिर, गवंडीवाडाचे ‘उसन्या बायकोची वरात लग्नाची’ हे नाटक, २ रोजी रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपर्क- दिनेश वराडकर (९०४९०८११८१), ६ रोजी सकाळी ६ वा. हनुमान जन्म, रात्री १० वा. श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळ, राम मंदिर गवंडीवाडाचे ‘सरलष्कर’ हे ऐतिहासिक नाट्यपुष्प सादर होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात ३० पासून विविध कार्यक्रम
