बांदा/प्रतिनिधी
निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन रविवार दिनांक २ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. तरी सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, ओटी भरणे तसेच रात्री ९ वाजता मुलांचे, महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सर्व भाविकांनी देवीच्या दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती निगुडे यांनी केले आहे.
फोटो :-
निगुडे येथील श्री देवी माऊली.
निगुडेत २ एप्रिल ला श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन
