धारगळ मधील आयुष हॉस्पिटलच्या सुविधांचा लाभ घ्या

बांदा रोटरी क्लब चे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांचे आवाहन

बांदा/प्रतिनिधी
धारगळ येथील केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखील भारतीय आयुर्वेद संस्थानच्या आयुष हाँस्पीटलच्या सुवीधांचा अधिकाधीक लोकानी लाभ घ्यावा व औषधा सोबतच पंचकर्म उपचार पद्धतीचा अबलंब करुन आपले आरोग्य तंदुरुस्त करावे असे आवाहन रोटरी क्लब बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी येथे केले.
भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी वीवेकानंद संस्था कडशी-मोपा, रोटरी क्लब बांदा व उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ डोबाशेळ इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने इन्सुली येथे आयोजीत केलेल्या एक दिवशीय आरोग्य शीबीरात श्री कल्याणकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आयुष हाँस्पीटलचे कार्यक्रम संयोजक डाँ. प्रशांत ससाणे, स्वामी वीवेकानंद संस्थेचे उपाध्यक्ष उमेश शंकर गाड, इन्सुली उपसरपंच कृष्णा सावंत, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष रघुवीर देउलकर, डॉ. अमित भाग्यवंत, उत्कर्ष युवक मंडळाचे उपाध्यक्ष राम पालव, सदस्य स्वामी पेडणेकर, शुभम मुळीक, परशुराम पालव, सुनील सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
या शीबीराचा सुमारे दोनशे रुग्णानी लाभ घेतला. तर शीबीराचाच एक भाग म्हणुन आदल्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदिश पाटील यानी सुमारे ६७ रुणांची मोफत रक्त तपासणी केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. प्रशांत ससाणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन शीबीराचे उद्घाटन झाले. स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे उमेश गाड यांच्या हस्ते डॉ. जगदिश पाटील व उत्कर्ष युवक मंडळाचे उपाध्यक्ष राम पालव यांचा गौरव करण्यात आला.
उमेश शंकर गाड म्हणाले की, भारत सरकारने आपणाला एक मोठी देणगी आयुष हाँस्पीटलच्या रुपाने दिली आहे. त्याची माहीती समाजापर्यंत पोहचवण्यासाठी आमच्या स्वामी विवेकानंद संस्थेने अशा शीबीराच्या माध्यमातुन प्रचार व प्रसार करण्यासाठी शक्य ते प्रयत्न चालवले आहेत व जनता त्यास चांगला प्रतीसाद देत आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यानी केले. या शीबीरात डॉ. ससाणे सोबतच डॉ. योगेश शिंदे, डॉ. ललीता गावकर, डॉ. दिपश्री गावस यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यांना सागर धुरी, शुभम तीरोडकर, अमन शर्मा, वीनीता गाड, सीद्धेश व श्रीकात यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page