वैभववाडी संजय शेळके
हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचे नाव क्रीडासंकुलाला दिल्यामुळे महाविद्यालयाचे नाव मोठे झाले आहे. त्यांनी केलेल्या देश सेवेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मृतीतून विदयार्थ्यांसमोर आदर्श राहील. यातून देश सेवेची प्रेरणा विदयार्थ्यांना मिळेल. असे प्रतिपादन माजी शिक्षणमंञी तथा महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी केले.
येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृह, कै.सदाशिव रावराणे शैक्षणिक संकुलाचे नामफलक अनावरण व महाराणा प्रतापसिंह जीवन विकास केंद्र यांच्या उद्घाटन व हस्तांतरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष तावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, कौस्तुभ रावराणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाशकुमार रावराणे, संस्थेला चार एकर जागा देणारे सदाशिव रावराणे यांचे चिरंजीव भालचंद्र, रावराणे, कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, सचिव शैलेश रावराणे, विश्वनाथ रावराणे, कोषाध्यक्ष अर्जुन रावराणे, सज्जनकाका रावराणे , प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, गणपत रावराणे, शरद रावराणे, विक्रम रावराणे, प्रभानंद रावराणे, उदय रावराणे, सुबोध रावराणे, यशवंत रावराणे, सुरेश रावराणे, प्राचार्य सी.एस.काकडे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरीक्षक अमित यादव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला कै.सदाशिव रावराणे शैक्षणिक संकुल या नामफलकाचे आनावरण त्यांचे पुञ भालचंद्र रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहाचे उद्दघाटन कौस्तुभच्या आई वडीलांचे हस्ते फित कापून करण्यात आले. तर महाराणा प्रतापसिंह जीवन विकास केंद्र या सभागृहाचे उद्दघाटन आमदार नितेश राणे व विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष तावडे म्हणाले, कौस्तुभ यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या पत्नीही सैन्यदलात सेवा बजावत आहेत. त्यांचा लहान मुलगा अगस्ती याला कौस्तुभच्या जयंती दिवशी वैभववाडी काॕलेजचे विदयार्थी पञ पाठवून त्याच्या वडीलांचे कार्यकतृत्वाला उजाळा देतील. यामुळे अगस्ती याला आपल्या वडीलांचा अभिमान वाटेल. तसेच त्यांची जयंती २७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी सैन्य दलाबाबत मार्गदर्शन करणारे व्याख्यान आयोजित करावे. अशी सूचना त्यांनी खोरकर अरुळेकर मंडळाला केली.
आमदार नितेश राणे म्हणाले, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थाही विविध उपक्रम राबवत आर्दश विदयार्थी घडविणारी मोठी शिक्षण संस्था आहे. संस्था सुरु करणे सोपे आहे. परंतु ती वाढविणे व आदर्शवत काम करणे खूप अवघड काम आहे. हे काम या संस्थेने यशस्वीपणे केले आहे. अशा संस्थांच्या योगदानामुळेच आज महाराष्ट्रात कोकण पॕटर्नचा डंका असल्याचे त्यांनी सांगितले. तर क्रिडा संकुलाच्या कंपाऊड वाॕलसाठी ऐशी लाख इतका निधी देणार असे सांगितले. तसेच वैभववाडी – नावळे, सडुरे रस्त्यावर कौस्तुभ रावराणे यांच्या नावाने प्रवेशद्वार व रस्त्याला नाव देण्याचा प्रस्ताव करण्यात येईल असे आश्वासन दिले.
कौस्तुभ रावराणे यांच्या आई ज्योती यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले देवाने आम्हांला असा पुञ देऊन आम्हावर उपकार केले आहेत. त्याच्या स्मरणातून प्रेरणा देणे खूप महत्वाचे आहे. या संस्थेला आमच्या कुटुंबाकडून यथाशक्ति कायम सहकार्य राहील असे सांगितले.
यावेळी काॕलेजच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विदयार्थ्यांचा तसेच प्राध्यापक यांचा शाल, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
