निगुडेत मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

पारंपारिक वेशभूषा साकारून जागृत केली मराठी अस्मिता

बांदा/प्रतिनिधी
हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधत निगुडे गावात महिला लहान मुले यांनी पारंपारिक वेशभूषेत मराठी गाणी गात लेझीमच्या तालावर नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला हिंदूंच्या सणाची, मराठी नववर्षाचं स्वागत कसं करायचं या उद्देशाने सदर प्रभात गावात फेरी काढण्यात आली. सर्व महिलांनी नववारी साडी परिधान करत भगवे फेटे बांधून मराठी नववर्षचे स्वागत केले. प्रभात फेरीमध्ये निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, समीर गावडे, गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गावडे, शैलेश म्हाडगुत, माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, समीक्षा गावडे, लक्ष्मी दळवी, महिला रोहिणी गावडे, नेहा पोखरे, शुभांगी गावडे आदी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
श्री देव पिंपळेश्वर मंदिर निगुडे- तेलवाडी ते श्री देवी माऊली मंदिर अशी फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषवाक्य देत फटाक्यांची आतषबाजी करत हिंदू नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जेष्ठ महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे यांनी सदर कार्यक्रमास सहकार्य केले. तसेच लेझीम साहित्य निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपलब्ध करून दिले. सदर कार्यक्रमाची सांगता श्री देवी माऊली मंदिर निगुडे याठिकाणी करण्यात आली.

You cannot copy content of this page