शेतकऱ्यांनो संघटित व्हा तुमचा काजू कवडीमोल दराने विकू नका …

बबन साळगावकर; काजू बागायतदारांना शासनाने योग्य हमीभाव मिळवून द्यावा…

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटितपणे एकत्र होत काजूचा दर पाडून खरेदी केला जात आहे, त्यामुळे येथील काजू बागचारांचे नुकसान होत असून शासनाने काजूला योग्य हमीभाव द्यावा अन्यथा काजू स्वतः खरेदी करावा अशी मागणी माझी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांनो संघटित व्हा तुमचा काजू कवडीमोल दराने विकू नका असेही आवाहन त्यांनी केले आहे.

श्री साळगावकर यांनी पत्रक प्रसिद्ध दिले आहे त्यात असे म्हटले की, कोकणातील प्रमुख उत्पन्न असलेल्या काजूला योग्य हमीभाव मिळत नाही,
सध्याच्या काजू सीझनमध्ये शेतकऱ्यांचा काजू अत्यंत कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे कोकणचा काजूची पत एक नंबरची आहे त्याची चवही चविष्ट आहे, हा काजू देशामध्ये चांगला काजू म्हणून ओळखला जातो परंतु येथे संघटित काही जणाकडून काजू दर पाडून खरेदी केला जात आहे.
त्यामुळे येथील शेतकरी बागायदाराचे मोठे नुकसान होते. शेतकरी बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तेथील लोकप्रतिनिधी सतर्क राहतात त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना हमीभाव प्रत्येक उत्पन्नाचा मिळत असतो परंतु कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असूनही हमीभाव मिळत नाही ही शोकांतिका आहे, इथल्या तिन्ही आमदारांनी खासदारांनी यात वेळीच लक्ष घालावे व शेतकऱ्यांना हमीभाव मिळून द्यावा नाहीतर असले लोकप्रति हवेतच कशाला.

श्री साळगावकर पुढे म्हणाले, इथल्या लोकप्रतिनिधींनी आंबा काजू बागायतदार यांचा प्रश्न कधी सहभागृहामध्ये लावून धरल्याचे दिसलेले नाही तरी शासनाने दखल घेऊन बागायतदारांना हमीभाव द्यावा किंवा शासनाने काजू स्वतः खरेदी करा तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो.

You cannot copy content of this page