सावंतवाडीत प्रकार उघड; सुरेश भोगटे यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष, कारवाईची केली मागणी
सावंतवाडी ता.२४-: आनंदाचा शिधा धान्य पुरवठा धारकाकडून सावंतवाडी तालुक्याला पाठवलेल्या धान्याच्या वजनात मोठी तफावत आढळून आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत माजी नगरसेवकांनी आज सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांचे लक्ष वेधले असून संबंधित पुरवठा धारकावर कारवाई झालीच पाहीजे अन्यथा उपोषण छेडणार असल्याचा इशारा त्यांना दिला.
शिंदे फडणवीस सरकारकडून गरिबांसाठी रेशन धान्य दुकानावर आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे सावंतवाडी तालुक्याला प्राप्त झाला होता येथील पुरवठा विभागाच्या गोडांमध्ये संबंधित पुरवठाधारकाने हा शिधा ट्रक मधून पाठवला होता परंतु साखर तूरडाळ व अन्य धान्याच्या वजनामध्ये मोठी तफावत आढळून आली येथील गोडाऊनच्या मापारी कडून संबंधित धान्याचे वजन केले असता त्यामध्ये मोठी तफावत दिसून आली प्रत्येक धान्याच्या एकूण वजनामध्ये असलेली तफावत संबंधित मापारी कडून व गोडाऊनच्या इन्चार्ज करून तहसीलदार यांच्या कानावर काढण्यात आले त्यानंतर संबंधित धान्य हे ताब्यात न घेता परतवून लावण्यात आले दरम्यान झालेला हा प्रकार माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या लक्षात येतात त्यांनी आज यासंदर्भात तहसीलदार श्री उंडे यांची भेट घेत चर्चा केली यावेळी तहसीलदार यांनी सदरचा धान्याचा ट्रक हा परत पाठवला असल्याचे स्पष्ट केले आम्ही आलेला महाल वजन करूनच ताब्यात घेतो त्यामुळे तक्रार करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र ज्या पुरवठा धारा काकडून वजनामध्ये ही तफावत घडवून आणली ती चुकीची असून पुरवठाधारकावर कारवाई झालीच पाहिजे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे त्यामुळे यासंदर्भात आपण आवाज उठवणार असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही वेळप्रसंगी उपोषणही छेडू असे श्री भोगटे यांनी सांगितले.यावेळी उमाकांत वाराण विलास जाधव आदी माजी नगरसेवक उपस्थित होते.
