शिक्षण पंढरी पुण्याचे दर्जेदार शिक्षण आता सावंतवाडीत

गुरू ग्लोबल स्कूल सुरू होतेय २ एप्रिल पासून;३ ते ६ वयोगटासाठी १० एप्रिल पासून समर कॅम्पचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२४-: देशाची शिक्षण पंढरी असलेल्या पुण्याच्या धर्तीवर शिक्षण आता सावंतवाडीत मिळणार आहे. गुरू ग्लोबल स्कूल २ एप्रिल रविवार २०२३ रोजी सुरू होत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या गुरू ग्लोबल स्कूल यांच्यावतीने तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते ३० एप्रिल कालावधीत याचे आयोजन करण्यात आले असून नियमित सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत समर कॅम्प भरणार आहे. थीम बेस ऍक्टिव्हिटी, लिटल ऍस्ट्रॉनट, क्ले मोडलिंग, इन डोअर गेम, स्टोरी टेलिंग, स्टीम बेस्ड ऍक्टिव्हिटी, आर्ट अँड क्राफ्ट योगा अँड मेडिटेशन आदी उपक्रम समर कॅम्प मध्ये घेतले जाणार आहेत.

यासाठी मर्यादित जागा असून आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन गुरु ग्लोबल स्कूल यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणी करिता 9922903515, 9422633433, 9172693343 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page