⚡सावंतवाडी ता.२२-: गुढीपाडवा व नव नववर्षानिमित्त सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने येथील राजवाडा परिसर तसेच एसटी स्टँड परिसरात जिलेबी वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू सण तसेच मराठी या मुद्द्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. आज नवीन वर्षाचे औचित्य साधून सदर जिलेबी वाटपाचा कार्यक्रम मनसेच्यावतीने आनंद उत्सव म्हणून करण्यात आला.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी शहर उपाध्यक्ष प्रविण गवस, शुभम सावंत, दर्शन सावंत, मनीष सावंत, मंदार सुभेदार, गोविंद सोनी, अनुप सोनी आदी उपस्थित होते.
