पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले बदलीचे आदेश;यापूर्वी ठाणे ग्रामीणला बजावली सेवा..
*💫कणकवली दि २२-:* कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी संजय मधुकर धुमाळ यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीस निरीक्षक श्री.धुमाळ यांची कणकवली पोलीस ठाण्यात बदली केली आहे. श्री. धुमाळ यांची ठाणे ग्रामीण मधून सिंधुदुर्गात बदली झाली होती.१८ नोव्हेंबर रोजी ते जिल्हा नियंत्रक कक्षात हजर झाले होते. कणकवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या बदलीनंतर कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. अखेर रविवारी त्यांनी कणकवली पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या रुपात कणकवली पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक मिळणार आहेत. त्याच्यासमोर अलीकडेच पंधरवड्यात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान असणार आहे. पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी कणकवली पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला यावे यांचे पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जगदीश बांगर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.