मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आंदोलन
*मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर यांचा इशारा
वेंगुर्ला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे विज बिलासंदर्भात जो निर्णय देतील त्यावर मनसे वेंगुर्लाच्या वतीने वीज वितरण कार्यालय वेंगुर्ले येते खळखट्याक करण्यात येईल, असा इशारा मनसेचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला. या प्रसिद्धीपत्रका बागकर म्हणाले की, वीज बिलाबाबत अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून कोणतेही धोरण ठरलेले नाही. त्यामुळे वीज अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे ग्राहकांवर सक्ती करू नये, अन्यथा मनसे स्टाइलने शॉक देऊ, असे बागकर यांनी सांगितले. लॉकडाऊन दरम्यान जनतेला वाढीव बिल माफ व्हावे यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिले पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल माफ होणार नाही असं जाहीर केलं जर लोकांकडून बळजबरीने वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा असं श्री बागकर यांनी म्हटलं आहे लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावाच लागेल विज बिल आज कुठलीही माफी अथवा सवलत नाही असं विधान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले होतं त्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यावरून रान उठले आहे आम्ही वीज बिल भरणार नाही सक्तीची वसुली करून बघा जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका मनसेने घेतली आहे