२३ रोजी गोविंद सुपर मार्केट येथे शिमगोत्सव रोंबाट महोत्सव

भाजप आणि विशाल सेवा फाउंडेशनचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी ता २१
भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी गोविंद सुपर मार्केट मैदान ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट २०२३ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शिगमोत्सव रोबाट २०२३ या कार्यक्रमात नेरुर गावचे व स्थानिक लोक कलाकार नृत्य , हलते देखावे दाखविले जाणार आहेत. यावेळी जेष्ठ नागरिक, जिल्हा मुख्यालय योगदान व्यक्ती, पत्रकार यांचे सत्कार केले जाणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे. यावेळी माजी खासदार निलेश राणे, विशाल परब, ओरोस सरपंच आशा मुरमुरे ,ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, राजन तेली, भाई सावंत, प्रभाकर सावंत, सुप्रिया वालावलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अमोल ग्रुप ओरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page