चोरव्हाळी माळरानावरील काजू, आंबा कलमे जळून खाक

तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान;अग्नीशमन बंबने आग आटोक्यात आणल्याने लगतच्या बागायती

⚡वेंगुर्ले ता.२१-: वायंगणी पंडितवाडीलगतच्या चोरव्हाळी माळरानावरील उत्पन्न देणारी सुमारे ३५ काजू कलमांसहित आंबा व जंगली झाडे आगीत जळून सुमारे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले. सदरची आग वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने विझविल्यामुळे लगतच्या बागायतीचे नुकसान टळले.

वायंगणी ग्रामपंचायतीनजीक पंडितवाडीलगतच्या भेंणयाम माळरानावरील मंदा खानोलकर, पुष्पा खानोलकर, इंदुमती खानोलकर यासह अन्य शेतकयांच्या काजू आणि इतर जंगली झाडे असलेल्या बागेस रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लागल्याचे ग्रामस्थाने पाहिले.

त्यानुसार स्थानिक पपू धोंड, आप्पा पौड, बाबा पंडित, सिद्धेश सावंत, सत्वशील परच अर्जुन पंडित, श्रीधर पंडित, रवींद्र पंडित, सागर मोघे, साईल पंडित, नाना पंडित, विजय वेंगुर्लेकर यासह २५ ग्रामस्थांनी बदल्या, कळश्यांच्या साहय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले यावेळी सुमन कामत यांनी याबाबत माहिती वेंगुर्ले पोलीस स्टेशनला दिली व अग्निशमन पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार वेंगुर्ले नगर परीषदेचा अग्निशामक तात्काळ दाखल झाला.. तासाभरात सदरची आग विझविण्यात यश आले. मात्र, सुमारे ३५ हून जास्त काजू कलमे आगीच्या मध्यस्थानी पडून सुमारे आग तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
यानुकसानीचा पंचनामा राज्य शासनाचे कर्मचारी संपावर गेल्याने झालेला नाही.

You cannot copy content of this page