“शिवगर्जना” महानाट्याचा तीन लाखाहून जास्त जणांनी घेतला लाभ…

विशाल परब यांची ही मेहनत म्हणजे आगामी लोकसभेची नांदी नव्हे ना…? जनतेतून तर्कवितर्क..

⚡सावंतवाडी ता.२०-: माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या “शिवगर्जना”या महानाट्याचा जिल्ह्यातील जवळपास तीन लाख हून अधिक शिवप्रेमी, निलेश राणे प्रेमीनी लाभ घेतला.एकूणच श्री परब यानी घेतलेली ही मेहनत लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणूक ते लढणार नाही ना अशी चर्चा आता जनतेतून व्यक्त केली जात आहे.

विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित “शिवगर्जना” हे महानाट्य मोफत कुडाळ नवीन एसटी डेपोच्या मैदानावर मागचे तीन दिवस आयोजित केले होते. गेले तिन्ही दिवस या महानाट्यासाठी शिवप्रेमी आणि निलेश राणे प्रेमी यांनी रेकाॅर्ड ब्रेक गर्दी केली होती, गर्दीने महानाट्याचे मैदानावर खचाखच भरुन गेले होते. चक्क पोलिस यंत्रणेला याची दखल घ्यावी लागली होती तर अनेकांना गर्दी अभावी हे महानाट्य पाहताही आले नाही, जनतेतून आलेले रिझल्ट पाहता जवळपास तिन्ही दिवसाची आकडेमोड करता तीन लाखाहून अधिक जणांनी या महानाट्याचा लाभ घेतला. श्री परब यांनी आधी पंधरा दिवस या महानाट्याची प्रसिद्धी बॅनरबाजी केली, मोफत पास गावागावात पोहचविले ते पाहता या सगळ्या मागे विशाल परब यांचा नेमका उद्देश काय असावा ते कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे सगळे प्रयत्न तर करत नसावे ना असा तर्क वितर्क जनतेतून लढविला जात आहे. कारण आताचे शालेय शिंत्रे दीपक केसरकर यांनी आपल्या पहिल्याच आमदारकीच्या निवडणुकीआधी “संभवामी युगे युगे” हे महानाट्य जनतेसाठी मोफत आयोजित केले होते. त्यांनी केलेली प्रसिध्दी व नियोजन पाहता श्री विशाल परब यांनी “शिवगर्जना” या महानाट्याच्या माध्यमातून तसाच प्रयत्न केल्याचा कयास लोकांनी लावला आहे, मात्र याबाबत श्री परब यांना डिवचले असता आपण केवळ निलेश राणे आणि राणे कुटुंबियांच्या प्रेमाखातर हे सर्व करत असल्याचे त्यांनी सांगून सर्व तर्क वितर्क मोडून काढले.

You cannot copy content of this page