ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज च्या बातमीची बांधकाम विभागाने घेतली दखल
*💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव गुलाबी तिठा येथे अपघात झाल्यानंतर बांधकाम विभागाचा गलथान कारभार “ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्युज” ने प्रसिद्ध केल्यानंतर या बातमीची तात्काळ दखल घेतली असून, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे उपाध्यक्ष आसिफ शेख यांनी बांधकाम विभागाला स्वः खर्चाने घालून देत असलेल्या स्पिड ब्रेकरच्या कामावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आसिफ शेख यांनी स्वः खर्चाने स्पिड ब्रेकर घालत समाजा समोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
