नरहरी चिंदरकर यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व स्मृतीलीला पुरस्कार

⚡मालवण ता.१९-:मालवण स्पोर्ट्स असोसिएशन व सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आयोजित कै. लीलाधर गणेश हडकर यांच्या तृतीय स्मृती प्रित्यर्थ हडकर कुटुंबिंयांच्या वतीने सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्व स्मृतीलीला पुरस्कार ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री. नरहरी जयराम चिंदरकर यांना देऊन गौरविण्यात आले. तसेच हॉलीबॉलपटू विलास हरिश्चंद्र हरमलकर, बॅडमिंटन प्रशिक्षक महेश रामचंद्र परब, उदयोन्मुख टेबलटेनिसपटू आर्या अश्विन दिघे, उदयोन्मुख क्रिकेटपटू मंदार भूषण माडये यांनाही स्मृतीलीला देऊन गौरविण्यात आले.

मालवण येथील लिलांजली हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष स्थानी डॉ. सुभाष दिघे तसेच मालवण स्पोर्ट्स अशोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटये, सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवणचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे सर्वेसर्वा विष्णू कोरगावकर, मालवणी कवी रुजारीओ पिंन्टो, देवदत्त उर्फ भाऊ हडकर, श्रीमती अंजली लीलाधर हडकर आदी उपस्थित होते.

यावेळी कै. लीलाधर गणेश हडकर यांच्या समवेत क्रिकेट खेळलेले उत्कृष्ट क्रिकेटपटू श्री. नरहरी जयराम चिंदरकर यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून स्मृतीला पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ. सुषमा नरहरी चिंदरकर यांचाही सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट हॉलीबॉलपटू श्री. विलास हरिचंद्र हरमलकर यांना हॉलीबॉल मध्ये स्मृती लीला पुरस्कार देण्यात आला. तर शासकीय नोकरीतून निवृत्ती घेत बॅडमिंटनचे खेळाडू घडविण्यात त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करणारे श्री. महेश रामचंद्र परब यांना बॅडमिंटनमध्ये स्मृती लिलापुरस्कार देण्यात आला. त्याच प्रमाणे उदयोन्मुख खेळाडू म्हणून टेबल टेनिसपटू कु. आर्या अश्विन दिघे हिला तर कु. मंदार भूषण माडये याला क्रिकेटसाठी उदयोन्मुख खेळाडू म्हणून स्मृती लीला पुरस्कार देण्यात आला. तसेच रुद्र संदीप शिरोडकर, सौरव के. पी., आयुष राजेंद्र कदम या उदयोन्मुख खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी हॉलीबॉलपटू विलास हरमलकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत खेळाडूंनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी रूजारीओ पिंन्टो यांनी आपली मालवणी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. सुभाष दिघे यांनीही जुन्या आठवणी सांगताना स्मृति लिला पुरस्कार हा कार्यक्रम दरवर्षी घेऊन उचित खेळाडूंचा सन्मान आयोजकानी करावा, असे सांगितले.

यावेळी मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी नंदू देसाई, पप्पू परब, निळकंठ मालडकर, सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवणचे अजित गवंडे, प्रदीप वेंगुर्लेकर, मिलिंद झाड, अरुण दुधवडकर, संतोष नागवेकर, हडकर कुटुंबीय, आरोलकर कुटुंबीय, जयमाला मयेकर, सौं. माडये, श्री. जितेंद्र वाळके सौ. प्राजक्ता हडकर, सौ शुभांगी हडकर, हॉलीबॉलपटू अरविंद सराफ, राजा शंकरदास, मिनिंन फर्नांडिस, वाघमारे, सुजन परब आदी व इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजय शिंदे यांनी केले.

You cannot copy content of this page