घाट व दरडी कोसळण्याची शक्यता; पोलिस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज…
⚡सावंतवाडी,ता.१९ प्रसन्न गोंदावळे-: आंबोली घाटात अवजड वाहतुकीला बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वरदहस्ताने अवजड वाहतूक राजरोस सुरु आहे, त्यामुळे आधीच धोकादायक झालेला आंबोली घाट अजून धोकादायक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षकांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.
आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात सुरुच असतात मात्र याकडे आजपर्यंत ठोस उपाय योजना झाल्या नाही, ब्रिटीशकालीन काही पुलांची दुरुस्ती वनखात्यामुळे होत नाही त्यामुळे मुख्य धबधबा तसेच चाळीस फूट जवळील मोरीही पूल कमकुवत आहेत. तर अवजड वाहनांच्या हादर्याने दरडी तसेच कठडे कोसळतात. अलिकडेच खोदलेल्या जिओ केबल मुळे एकबाजूने घाट कमकुवत झाला आहे त्यात अवजड वाहनांमुळे घाट रस्ता अति धोकादायक होत चालला आहे. अवजड वाहतूक बंद असताना वाहतुक पोलिस दिवस रात्र आपल्या वरदहस्ताने १६ चाकी १८ चाकी गाड्या घाटातून सोडत आहेत.
अलिकडेच आंबोली घाटातून अवजड वाहतूक करणारा ट्रक रात्रीचा बंद पडल्याने पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.यावर आता पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
