शिवसेना व भाजपाकडूनच कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न…

परशुराम उपरकर यांचा टोला;सुसंस्कृत सिंधुदुर्गात हा प्रकार अशोभनीय

*💫कणकवली दि.१८-:* सिंधुदुर्गात केंद्र व राज्यातील सत्ताधारी पुतळे जाळून वातावरण गढूळ करत आहेत.त्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तारांबळ आहे.शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आजी-माजी खासदारांचे पुतळे जाळले जात आहेत.एकमेकांना समोरासमोर येण्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना व भाजपाकडून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.तसेच सुसंस्कृतपणा घालवण्यासाठी चढाओढ आहे. जनतेने या शिवसेना- भाजपच्या लोकांना वेळीच रोखावे,असे आवाहनही त्यांनी केले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर बोलत होते.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी एकमेकांचे पुतळे जाळतात. सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृत आहे,नाथ पै सारखे उत्कृष्ट संसदपटू होते.आजी माजी खासदार खालच्या पातळीवर जात आरोप प्रत्यारोप करत आहेत.हिंदू धर्मात काही नियम आहेत,त्यांचे उल्लेख माजी खासदार शिवसेना खासदारांना दोन दोन पत्नीचे उल्लेख करुन वाईट चर्चा केली आहे.आघाडी सरकारमध्ये मंत्री संजय राठोड व मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकरणे गाजत आहेत,असा टोलाही परशुराम उपरकर यांनी लगावला. होत असलेले प्रकार लोकांना वाईट दिसत आहे,ज्या अपेक्षेने निवडुन दिलेल्या मतदारांना चूकीच्या लोकांना दिले आहे असे वाटत आहे..आता जिल्ह्यातील जनता संभ्रमात आहे.काही वर्षांपूर्वी राणेंना शिव्या देणारे आज राणे कुटुंबातील लोकांचे पुतळे जाळतात.राणेंवर आरोप केले जातात.आरोप करणारी व्यक्ती एकच आहे,पण तेच टीका करत असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली.

You cannot copy content of this page