*जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आली कारवाई*
*💫सावंतवाडी दि.१८-:* राज्यात पुन्हा एकदा वाढत असलेला कोरोना आजाराचा प्रसार पाहता, सावंतवाडी शहरात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न लावता बाजारात फिरणाऱ्यांवर धडक दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी देविदास आडारकर, विनोद सावंत, वाहतूक पोलीस प्रविण सापळे यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अचानक पणे केलेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय सेवक, जबाबदार नागरिकांचे देखील धाबे दणाणले आहेत.
