निलेश राणे हे आमदार होऊ दे

कांदळगावच्या रामेश्वर चरणी घातले साकडे

⚡मालवण ता.१७-:
भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात गणेश पूजन, अभिषेक, लघुरुद्र विधी करण्यात आले. यावेळी येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून निलेश राणे आमदार होऊ देत असे गाऱ्हाणे रामेश्वर चरणी घालण्यात आले.

निलेश राणे यांचा वाढदिवस मालवण भाजपच्या वतीने विविध उपक्रमांनी तालुक्यात साजरा करण्यात येत आहे. आज सकाळी कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर मंदिरात गणेशपूजन, अभिषेक, लघुरुद्र आदी विधी पार पडले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, निलेश खोत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page