नारायण राणे:अंतर्गत वाद बाजूला ठेवून काम करा; विशाल परब यांचे मानले आभार
⚡कुडाळ ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यायाने कोकणाचा विकास भाजपानेच केला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा,लोकसभा जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये एकही जागा विरोधी पक्षाला देता कामा नये याची काळजी घ्या, कुठलेही अंतर्गत वाद नको अशी साद केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे कार्यकर्त्यांना घातली. तसेच राणे कुटुंबिय नेहमीच जिल्हा वासियांच्या पाठीमागे उभे राहील असे आश्वासनेही त्यांनी दिले. विशाल परब फाउंडेशनच्या वतीने कुडाळ येथे आयोजित माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिनी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली आमदार नितेश राणे तसेच भाजपाचे जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित शिवगर्जना कार्यक्रमाला जिल्हाभरातील शिवप्रेमी निलेश राणे प्रेमी यांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी उपस्थित जनतेने निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री राणे पुढे म्हणाले केंद्रातील मोदी सरकारने जनतेला भरभरून दिले आहे, त्यामुळे लोकसभेत 40 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्यासाठी आम्ही आत्तापासूनच कामाला लागलो आहोत, भारतीय जनता पार्टीने कोकणावर पर्यायाने सिंधुदुर्गवर नेहमीच प्रेम केले आहे त्यामुळे आगामी काळात सर्वच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलण्यासाठी कार्यकर्त्यांनी अंतर्गत वाद मोडीत काढत एकजुटीने कामाला लागावे,विशाल परब यांनी या ठिकाणी शिवगर्जना हे महानाट्य आयोजित करत निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
