⚡मालवण ता.१७-: मालवण येथील फुले, शाहू आंबेडकर विचारमंचतर्फे दि.१४ एप्रिल रोजी दुपारी २ वा ते ६ वा या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे गायन पार्टी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत प्रथम आठ संघांना सहभागी करून घेण्यात येईल. स्पर्धकांना नियमावली दिली जाईल. स्पर्धक संघांनी आपली नावे राजेंद्र कदम, ९४२२४३६९०८. विलास देऊलकर, रंजन तांबे, श्रीकांत मालवणकर यांच्याकडे नावे द्यावीत, असे आवाहन फुले, शाहू आंबेडकर विचारमंच मालवणचे अध्यक्ष आनंद मालवणकर व सचिव संजय जाधव यांनी केले आहे.
