महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी ऍड. भाऊ चव्हाण तर सचिव पदी कांता चव्हाण यांची निवड

⚡मालवण ता.१७-: महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी गोळवणचे समाजाभिमुख व्यक्तिमत्व ऍड.भाऊ सदाशिव चव्हाण यांची तर सचिवपदी कांता चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड राज्य संघटक विजय सीताराम चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष संदीप चव्हाण-तळगाव, कार्याध्यक्ष शुभम लाड (मालवण) खजिनदार – जगदिश चव्हाण (मसुरे) सचिव- कांता चव्हाण (मालवण सहसचिव- गणेश चव्हाण (श्रावण सल्लागार – बा. स. लाड (कोळंब) आनंद आचरेकर (मालवण), विजय शिवा चव्हाण (मालवण), विभागप्रमुख अभी लाड (बागायत) ओंकार आचरेकर (आचरा), प्रशांत चव्हाण (मसुरे), अभिनय सकपाळ (चौके), रवींद्र चव्हाण (कट्टा), सूर्यकांत चव्हाण (सुकळवाड), प्रसाद चव्हाण (पोईप), गुरुप्रसाद चव्हाण (श्रावण), अंकुश चव्हाण (मालवण शहर, जगदीश वालावलकर, शहर. उपाध्यक्ष, नीलेश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष. मावळते अध्यक्ष आनंद आचरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मावळते अध्यक्ष व नाभिक समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अॅड. भाऊ चव्हाण यांनी शाल, श्रीफळ व गणपतीची प्रतिमा देऊन सन्मान केला.

यावेळी मावळते तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, सचिव कांता चव्हाण, जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, दीपाली शिंदे, विशाखा वि, चव्हाण, तळगावचे नाभिक समाजसेवक जगदिश चव्हाण, संदीप चव्हाण, जग्गू (टेलर्स) चव्हाण, हरेश चव्हाण, विलास उर्फ गोट्या आचरेकर, हेमंत चव्हाण, पोईप, अंकुश चव्हाण, जगदिश वालावलकर, नीलेश चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन व प्रास्ताविक कांता चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page