मालवणात उद्या उद्योजकांना मार्गदर्शन

⚡मालवण ता.१७-: भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून व केंद्रीय लघु सुक्ष्म- मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय – लघु- सुक्ष्म- मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने दि. १८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता मालवण येथील देवज्ञ भवन येथे उद्योजक, नवीन उद्योजक, व्यापारी, होलसेलर, बचत गट यांना उद्योगासाठी आवश्यक कर्जपुरवठा, सरकारकडून, मिळणारे अनुदान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ज्या उद्योजकांची कर्ज प्रकरणे बँकेने प्रलंबित ठेवली आहेत. तसेच सरकारचे अनुदान उपलब्ध झालेले नाही, अशा उद्योजकांनाही मार्गदर्शन करून ताबडतोब प्रश्न सोडविण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या मार्गदर्शन मेळाव्यात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, खादी ग्रामोद्योग कर्जपुरवठा व अनुदान, कॉयर बोर्ड नारळापासून वस्तू बनविण्यासाठी कर्जपुरवठा आणि अनुदान व आवश्यक बाजारपेठ, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मच्छीमारांना फायदे, अनुसूचित जाती जमाती उद्योजकांना व्यवसायाबद्दल माहिती, प्रशिक्षण व अनुदान, एक कोटीवरील उद्योगाला एमएसएमईमार्फत स्वतंत्र मार्गदर्शन व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन, पर्यटन उद्योगासाठी मार्गदर्शन, सामूहिक उद्योग क्लस्टर याची माहिती व फायदे, महिला उद्योजकांना ८० टक्के अनुदान योजना आदी उद्योगांची उद्योग लाभार्थीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. या मेळाव्यास एमएसएमईचे वरिष्ठ अधिकारी व खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, कॉयर बोर्ड, एससी / एसटी हब या सर्वांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्योजकांना कर्जपुरवठा घेताना आवश्यक असणारे उद्योग आधारची नोंदणी मोफत करून देण्यात येणार आहे. यावेळी आधारकार्ड व बँकेचा खाते नंबर घेऊन येणे आवश्यक आहे. सर्व उद्योजक, व्यापारी, बचत गट यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मौनीनाथ मंदिर ट्रस्टने केले आहे. अधिक माहितीसाठी भाजपच्या उद्योग- व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, मौनीनाथ- मंदिर ट्रस्टचे सचिव गणेश कुशे यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page