⚡सावंतवाडी ता.१७-: निरवडे येथील बाईतवाडी-रोहिदासनगर ते मेस्रीवाडीकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, माजी ग्रामपंचायत संदिप पांढरे, पोलीस पाटील अजित वैद्य, काका पांढरे, मुकुंद बाईक, प्रभाकर बाईत, यशवंत निरवडेकर, महादेव निरवडेकर, नामदेव निरवडेकर, सोमा निरवडेकर, संतोष निरवडेकर , प्राक्तन निरवडेकर, जगन्नाथ निरवडेकर, मुरारी भाईडकर, आप्पा बाईत, विवेक मल्हार, प्रकाश गावडे, लक्ष्मण बाईत, अशोक निरवडेकर, वंसत भाईडकर, दिंगबर बाईत, विजय मल्हार, विजय बाईत , एकनाथ बाईत, अनिल बाईत, विष्णु बाईत, रोशन मल्हार, सुनिल मल्हार, श्रेयस मल्हार, मनिष मल्हार, रविंद्र मल्हार, दत्ताराम बाईत, नामदेव मेस्री, विलास मेस्री, राजन मेस्री, बाबू मेस्री आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली कित्येक वर्षे या रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता. ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत मल्हार यांचे आभार मानले .
