Headlines

12 वीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून

तर.10 वीच्या परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होणार

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 12 वीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षा या शुक्रवार दिनांक 23 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 21 मे 2021 या कालावधीत होणार आहेत. तर 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा गुरुवार दिनांक 29 एप्रिल ते बुधवार दिनांक 20 मे 2021 या दरम्यान होणार आहेत.

       परीक्षांचे दिनांक निहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे हे कळवितात.

You cannot copy content of this page