आमदार वैभव नाईकांच्या कामाचा आदर्श शिक्षणमंत्र्यांनी घ्यावा…

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा दीपक केसरकर याना सल्ला

⚡सावंतवाडी ता.१७-: स्वतःकडे कोणतही मंत्रिपद नसताना आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आदर्श बिनकामाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घ्यावा असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .यावेळी त्यांनी दीपक केसरकरांवर टीका केली.

ते म्हणाले, केसरकर शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीच्या अर्धी कारकीर्द त्यांना मंत्रिपदाची मिळाली मात्र त्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी किती कामे केली आणि ती पूर्णावस्थेत नेली हे दाखवावे .स्वतः गृहराज्यमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्याचे ट्रेनिग सेंटर सिंधुदुर्गात होणार म्हणून भूमिपूजन केले मात्र आता ते ट्रेनिग सेंटर रद्द होण्याच्या मार्गावर आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा अद्याप पत्ता नाही .केसरकरांच्या कारकिर्दीत एखादे काम झाले असे सर्वसामान्य माणूसही सांगू शकत नाही अशी कारकिर्द केसरकरांची राहिली आहे.उलट मंत्री नसताना आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ ओरोस सारख्या बसस्थानकाचे काम मार्गी लावले त्यामुळे आमदार नाईकांचा आदर्श केसरकरांनी घ्यावा असा सल्ला रुपेश राऊळ यांनी दिला.

यावेळी या जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, रश्मी माळोदे श्रुतिका दळवी,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page